ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिलरी क्लिंटन यांच्यापासून राहुल गांधी, शरद पवार... जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2020 08:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हिलरी क्लिंटन यांच्यापासून राहुल गांधी, शरद पवार... जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

शहर : देश

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अगदी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सध्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस, यांच्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मतदारांनी इतिहास घडवलाय, अमेरिकेत नवे पर्व सुरु- हिलरी क्लिंटन

“मतदार व्यक्त झाले आहेत त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची निवड केली आहे. अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना नाकारलंय. या निकालाने अमेरिकेच्या नवीन पर्वाला सुरुवात झालीये. हे ज्यांनी घडवलं त्या प्रत्येकाचे आभार…”, असं हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

आपण करुन दाखवलं, अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष जो बायडन- कमला हॅरिस 

निवडणूक निकालानंतर नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘जो आपण करुन दाखवलं. अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष आपण असणार आहेत, असं असं कमला हॅरिस म्हणाल्या. या संभाषणावेळी कमला हॅरिस यांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.

आपण अमेरिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाल- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जो बायडन यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं. जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपण अमेरिकेल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाल, अशा शब्दात राहुल गांधी यांनी जो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बायडन, दिमाखदार विजयाबद्दल आपलं अभिनंदन- शरद पवार

जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. तसंच त्यांनी उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.

जो बायडन आपलं अभिनंदन – सुप्रिया सुळे

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जो बायडन आपलं अभिनंदन तसंच उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. .वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी ठरतात.त्यांचा आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असतो व ते त्यासाठी संघर्ष करतात. हे आपण महाराष्ट्रात घडताना पाहिलं आणि आता अमेरिकेतही घडलं, अशी बोलकी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

 

मागे

'वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!' - खासदार संजय राऊत
'वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!' - खासदार संजय राऊत

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ह....

अधिक वाचा

पुढे  

ट्रम्प समर्थकांनो झालं गेलं विसरुन जा, एकमेकांना नवी संधी देऊयात: जो बायडन
ट्रम्प समर्थकांनो झालं गेलं विसरुन जा, एकमेकांना नवी संधी देऊयात: जो बायडन

तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ....

Read more