ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार ?- हायकोर्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार ?- हायकोर्ट

शहर : मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारला केलीय. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या टोल वसुलीप्रकरणी हायकोर्टाने एमएमआरडीएला फटकारलं. जमा होणाऱ्या टोलचा महसुल सरकारच्या तिजोरीत जमा होतोय की नाही अशी विचारणा हायकोर्टाने केली.

याबाबत प्रतिज्ञापत्र दोन आठवडय़ात सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. एक्स्प्रेस वेवर म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत टोल घेतला जातोय. कंपनीला करारानुसार २०१९पर्यंत टोलवसुलीची मुभा आहे. शासनाने आणखी दहा वर्षं टोल वसूल करण्यास मुदतवाढ दिल्याने या टोल वसुलीला आक्षेप घेण्यात आलाय.

एक्सप्रेस वेवर झालेल्या खर्चापेक्षा कंपनीने काही हजारो कोटी रुपये वसुल केलेत असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. ही टोलधाड थांबवण्यासाठी कंपनीला नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी तसंच टोलवसुली लगेच थांबवावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय

मागे

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश
कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह ....

अधिक वाचा

पुढे  

सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?
सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. विदर्भात कोरोन....

Read more