ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कोरोनामुळे राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनामुळे राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन?

शहर : मुंबई

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर कायम राहिला तर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कशा होणार या प्रश्न समोर आहे.

10 वी-12 वीच्या परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. याबाबत पुढच्या आठवड्यात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. कोरोनाचा कहर पाहता परीक्षांबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात का? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

दुसरीकडे वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संध्याकाळी सहा नंतर नाईट कर्फ्युचा विचार सुरू आहे. त्या जिल्ह्यातील परिस्थिती नुसार जिल्ह्याधिकारी त्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतरही सुरक्षिच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडॉनची पाळी येऊ शकते त्यामुळे लॉकडाऊन करावं लागू शकतं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.  मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर 1305 इमारती सील. 2749 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण 71, 838 रहिवासी आहेत.

मागे

Coronavirus : कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका ऍक्शन मोडवर
Coronavirus : कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका ऍक्शन मोडवर

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus)  पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर कोर....

अधिक वाचा

पुढे  

SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आता आधार लिंक बंधनकारक, अन्यथा मोठे नुकसान
SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आता आधार लिंक बंधनकारक, अन्यथा मोठे नुकसान

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI ) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आधार लिं....

Read more