ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2020 10:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा

शहर : देश

कोरोनाव्हायरस (Coronavirus) सारख्याच जीवघेण्या संसर्गावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यातच भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) देशी कोरोनाव्हायरस लस (Covid 19 Vaccine) ‘कोवॅक्‍सिन (Covaxin) वर काम करत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कंपनीने या लसीचा तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी दिली तर या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसची ही देशी लस पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबरला लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी मागितली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 12 ते 14 राज्यांमध्ये तब्बल 20,000 अधिक लोकांनावर याची चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक साई प्रसाद म्हणाले की, कंपनीला वेळीच सर्व परवानग्या मिळाल्या तर 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लसीच्या तिसर्‍या क्लिनिकल चाचणीवर आम्हाला काम करता येईल.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या मदतीने विकसित केलेली कोवॅक्सिन ही लस एक शक्तिशाली रोगप्रतिकारक प्रणाली विकसित करण्यासाठी कोविड -19 विषाणूला ठार करण्यास मदत करेल.

दरम्यान, भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियादेखील कोरोना व्हायरसवर ‘कोवीशील्ड लस तयार करत आहे. भारत बायोटेक पेक्षाही कोवीशील्ड लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू असून ही लस लवकरच वापरासाठी येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरूवात केली असून आता त्याचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

 

मागे

नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी
नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

ठनागपूर मेट्रोच्या 2500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची CBI, ED द्वारे चौकशी करावी....

अधिक वाचा

पुढे  

सिटी सेंटर मॉलमध्ये आगीचा भडका कायम; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
सिटी सेंटर मॉलमध्ये आगीचा भडका कायम; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली आहे. गुरूवारी रात्री ९ च्य....

Read more