ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतालाही एका जो बायडनची गरज, 2024 पर्यंत मिळो असाच नेता; दिग्विजय सिंह यांचं मोठं वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2020 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतालाही एका जो बायडनची गरज, 2024 पर्यंत मिळो असाच नेता; दिग्विजय सिंह यांचं मोठं वक्तव्य

शहर : देश

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही बायडन यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच भारतालाही एका जो बायडनची गरज असल्याचं मत सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

“अमेरिकेप्रमाणे भारतालाही जो बायडन यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तो नेता जरी विशिष्ट पक्षाशी संबंधित असला तरीदेखील भारत आणि भारतीयत्व त्याच्यासाठी अधिक महत्वाचं असेल. देशात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना हरवून त्याने देशातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि 2024 मध्ये निश्चितपणे असा नेता भारताला लाभेल, असा आशावाद दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

जो बायडन यांना निवडून दिलेल्या अमेरिकेच्या जनतेचं मनापासून अभिनंदन. बायडन अमेरिकेची एकात्मता टिकवून ठेवण्याचं काम करतील. तसंच पहिल्या नेत्यासारखी विभाजनाची भाषा करणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आपण करुन दाखवलं, अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष जो बायडन- कमला हॅरिस 

निवडणूक निकालानंतर नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘जो आपण करुन दाखवलं. अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष आपण असणार आहेत, असं असं कमला हॅरिस म्हणाल्या. या संभाषणावेळी कमला हॅरिस यांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.

आपण अमेरिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाल- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जो बायडन यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं. “जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपण अमेरिकेल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाल, असं राहुल गांधी म्हणाले.

बायडन, दिमाखदार विजयाबद्दल आपलं अभिनंदन- शरद पवार

जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. तसंच त्यांनी उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.

मागे

एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'! रत्नागिरीत चालकाची आत्महत्या
एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'! रत्नागिरीत चालकाची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित रहावं लागलं ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांना 'बेस्ट'कडून दिलासा, वाढीव वीजबिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय
मुंबईकरांना 'बेस्ट'कडून दिलासा, वाढीव वीजबिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन....

Read more