ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 06:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस

शहर : पुणे

कोरोना व्हायरस पसरत असलेल्या या संकटाच्या काळात भारतातून एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डिसेंबरपर्यंत कोरोनाला हरवणारी लस उपलब्ध होणार असा दावा केला आहे.

या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. पूनावाला असेही म्हणाले की, ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.

पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही ICMR यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. त्यांना खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल.

सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली होती.

 

मागे

ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक
ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक

कोरोनाचे लक्षणे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आ....

अधिक वाचा

पुढे  

अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस
अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस

मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी असा दावा केला की त्यांच्या ....

Read more