ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 02, 2020 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार

शहर : देश

भारतात गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे खासगीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे (Indian railways towards privatization). अखेर बुधवारी (1 जुलै) रेल्वे प्रशासनाने याबाबत मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित केलं आहे. खासगी क्षेत्रातून केंद्र सरकारला जवळपसा 30 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

भारतीय रेल्वे 109 मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. या मार्गांवर जळपास 151 रेल्वे गाड्या चालवण्याची योजना आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली आहे (Indian railways towards privatization).रोजगाव वाढवणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवासाच्या हेतून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.या योजनेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या असतील. विशेष म्हणजे सर्व रेल्वे गाड्या भारतात तयार केलेल्या असतील. या गाड्यांचा वेग सरकारी रेल्वे गाड्यांच्या तुलनेत जास्त असेल. या रेल्वेगाड्या जवळपास ताशी 160 किमीच्या वेगाने धावतील.

दरम्यान, सर्व रेल्वेगाड्यांचा निर्मितीचा, देखभालीचा आणि दररोजचा खर्च खासगी कंपन्या करतील. या योजनेअंतर्गत खासगी कंपन्यांसोबत रेल्वे मंत्रालयाचा जवळपास 35 वर्षांचा करार होईल. सर्व रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेचे ड्रायव्हर आणि गार्ड्सकडून चालवण्यात येतील. खासगी कंपन्यांना भारतीय रेल्वेला ऊर्जा शुल्क तसेच निविदा प्रक्रियेद्वारे ठरवलेल्या महसुलाचा वाटा द्यावा लागेल.

देशात जवळपास 13 हजार प्रवासी रेल्वे गाड्या रेल्वेच्या विविध मार्गांवर धावतात. पण प्रवाशांची मागणी पाहता देशात 20 हजार रेल्वे प्रवासी गाड्या नियमित धावण्याची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

     

मागे

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार

केंद्रीय नागरी अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांनी चीनी उत्पा....

अधिक वाचा

पुढे  

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन सुरु, ठाणे ग्रामीण भागातही दहा दिवस कडक निर्बंध
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन सुरु, ठाणे ग्रामीण भागातही दहा दिवस कडक निर्बंध

‘कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ठाणे महापालिकेच्या वतीने जाही....

Read more