ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू

शहर : मुंबई

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६९६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या ११३० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५४,८७,५८१ वर जाऊन पोहोचला. यापैकी १०,०३,२९९ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४३,९६,३९९ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत एकूण ८७, ८२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा केला होता. तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोरोनावर देशी लस उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत देशात दररोज ९० हजाराहून नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, समाधानाची बाब हीच की, भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. भारताने नुकतेच रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले होते. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी आला आहे.दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. राज्यात रविवारी कोरोनाच्या २०,५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर ४५५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

मागे

राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी राज्यसभेत  नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंध....

अधिक वाचा

पुढे  

मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?
मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?

मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र....

Read more