ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शहरातील जीवघेणे खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 05:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहरातील जीवघेणे खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण

शहर : बेळगाव

स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील बहुतांश रस्त्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यासह बाजारपेठेतील रस्त्यावर जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेषत: चौकातील मोठ मोठे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती कधी होणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

विकासाच्या नावावर सर्वत्र खोदाई आणि खड्डे निर्माण झाल्याने संपूर्ण शहरातील रस्ते भकास झाले आहेत. काही रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आला आहे. या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. पण हे काम देखील संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. काही रस्त्यांवर खड्डे खोदण्यात आल्याने वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. शहर आणि बाजारपेठेतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

संचयनी चौक ते गोगटे चौक, युनियन जिमखाना रोड, एस. पी. ऑफीस रोड, जुना धारवाड रोड असे शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यांची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येते. सदर रस्ते महत्वाचे असून, याठिकाणी शहराचे प्रवेशद्वार आहे. पण या प्रवेशद्वारावरच मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून, बुजविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडुन तक्रार केली जाते मात्र हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे येत असल्याचे सांगून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली असता दुरूस्तीकरीता निधी उपलब्ध नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात येते. यामुळे संचयनी सर्कल, राणी चन्नम्मा चौक, कोल्हापूर क्रॉस, युनियन जिमखाना रोड या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांचा विकास तातडीने करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या रस्त्यांवरील खडय़ांमुळे अपघात घडण्याच्या घटना दररोज घडत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱया प्रशासनाने खड्डय़ांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.

मागे

चार चाकी वाहन असणाऱयांचे बीपीएल कार्ड होणार रद्द
चार चाकी वाहन असणाऱयांचे बीपीएल कार्ड होणार रद्द

स्वत:चे चार चाकी वाहन असणाऱयांनी बीपीएल कार्ड मिळविले असल्यास त्यांची कार्....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना  महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प....

Read more