ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 05:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

शहर : delhi

          नवी दिल्ली : डायरोक्टोरेट जनरल, सीआरपीएफ, गृहमंत्रांच्या आदेशानुसार अनेक पदांसाठी ७ व्या वेतन आयोगांतर्गत भरती करण्यात येणार आहे. याकरिता उमेदवार १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून उमेदवार ५ मार्च २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. 

         या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ही पद आता तात्पुरती आहेत. परंतु नंतर ती पदं सरकारने ठरविलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार कायमस्वरूपी केली जाऊ शकतात. पुरुष आणि महिलांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटीव्ह एग्झामिंनेशनच्या (एलडीसीइ) माध्यमातून या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा १९ एप्रिल रोजी घेण्यात येईल. पुरुष १ हजार ३३१ जागांमध्ये एससीच्या २०० व एसटीसाठी १०० जागा आहेत. तर महिलांच्या ८१ जागा असून त्यात एससी १२ आणि एसटीकरिता ६ जागा आहेत. तर जनरलसाठी ६३ जागा आहेत. पुरुषांसाठी १०३१ जागा जनरल कॅटगरीच्या आहेत. भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारास प्रतिमाह २५ हजारपासून ८१ हजार १०० रुपये वेतन मिळू शकते. यासाठी उमेदवारकडे कोणत्याही बोर्डमधून १२ वी पास असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराची अधिकाधिक वयोमार्यादा ३२ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २०१९ च्या आधारे उमेदवारच्या वयाची गणना केली जाणार आहे.   

           या भरतीबाबत अधिकृत वेबसाईट https: //www.gov.in/ recruitment. details. htm? 189/ advertise detail वर अधिक माहिती मिळू शकते. 

मागे

८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 
८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 

           नवी दिल्ली : ७ व्या आयोगांतर्गत पोस्टामध्ये अनेक पदांसाठी भ....

अधिक वाचा

पुढे  

सव्वा लाख गिरणी कामगारांना घरे कधी मिळणार? 
सव्वा लाख गिरणी कामगारांना घरे कधी मिळणार? 

            मुंबई : प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर गिरणी कामगार किंवा त....

Read more