ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लस चाचणी थांबवली; शरीरावर दुष्परिणाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 13, 2020 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लस चाचणी थांबवली; शरीरावर दुष्परिणाम

शहर : देश

कोरोनाविरुद्ध जगात लढा सुरु आहे. अनेक देश कोरोना लस बनविण्यावर भर देत आहेत. तसेच काही कंपन्याही आघाडीवर आहेत. मात्र, कोणालाही अंतिम यश प्राप्त करता आलेले नाही. कोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रशियाने कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. मात्र, जगात पूर्णपणे वापरण्यास योग्य अशी लस बनविण्यास यश आलेले नाही. जगभरातील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था करोना लशींवर काम करत असून, अमेरिकेतील जॉन्सन ॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. याचे दुष्परिणाम दिसून आल्याने हा निर्णय ण्यात आला आहे.

जॉन्सन ॅण्ड जॉन्सने कोरोना लस स्वयंसेवकांच्या शरीरावर टोचली. मात्र, दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ही लस चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर सध्या युद्ध पातळीवर लस तयार करण्याचे काम सुरुच आहे. अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन ॅण्ड जॉन्सनने कोरोनावर लस शोधून काढली आहे. या लसच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.

प्रायोगिक लसचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लसचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात होते.

मात्र, हे घडत असताना अचानक जॉन्सन ॅण्ड जॉन्सनने लसच्या चाचण्या थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले असून, जॉन्सन ॅण्ड जॉन्सनकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. कोरोना लशीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आले आहे. त्यामुळे चाचणी थांबविल्याचे जॉन्सन ॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे.

मागे

कायद्यातील कोणत्या तरतूदीच्या आधारे शालेय फी वाढीचा निर्णय घेतला?, राज्य सरकारचा हायकोर्टात सवाल
कायद्यातील कोणत्या तरतूदीच्या आधारे शालेय फी वाढीचा निर्णय घेतला?, राज्य सरकारचा हायकोर्टात सवाल

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शालेय फी वाढ न करण्याबाबत राज्य सरकारनं काढलेल....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश
मुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली ....

Read more