By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 06:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बेळगाव
बेळगाव – भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठीबहुल सीमाभाग कर्नाटकात डांभल्याच्या निषेधार्थ १९५६ सालच्या आंदोलांनातील हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आले. बेळगाव, कंग्राळी खुर्द, खानापूर आणि निपाणी येथे हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले असतानाचा मुजोर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
मुजोर कर्नाटक पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मंत्री पाटील आणि मुजोर पोलीस यांच्यात यावेळी वादावादी झाली. परंतु त्यांची आता सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, यड्रावकर हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेले होते. महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने सीमा भागातील हुतात्मा दिन कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून कोगनोळी टोलनाक्यापासून ते बेळगावपर्यन्त कर्नाटक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तरीही पोलिसांना चकवा देवून ते कोगनोळीतून बेळगावापर्यंत रिक्षाने आले होते.
मात्र, मुजोर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना हुतात्मादिनी अभिवादन करण्यापासून रोखले व त्यानंतर पोलिस आयुक्तालयात बसवून ठेवले. त्यानंतर काहीवेळाने त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना १ फेब्रु....
अधिक वाचा