ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पालघरमधल्या केतन जाधव याने, सर केले जगातील सर्वोच्च शिखर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 02:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघरमधल्या केतन जाधव याने, सर केले जगातील सर्वोच्च शिखर

शहर : पालघर

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या केतन जाधव या आदिवासी मुलाने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर २३ मे रोजी सर केला आहे.

केतन जाधव हा वाडा तालुक्यातील माधवराव काणे आश्रमशाळेत ११ व्या इयत्तेत शिकत आहे. २३ मे रोजी पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी केतन माऊंट एव्हरेस्टवर पोहोचला. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शौर्य-२ ही मोहीम आखली होती. या मोहिमेसाठी आदिवासी प्रकल्प विभागामार्फत वेगवेगळया जिल्ह्यातील ११ मुलांची निवड करण्यात आली होती. या अकरा मुलांमध्ये केतन जाधवही होता.

केतनला एव्हरेस्ट मोहिमेसाठी परवानगी देण्यास त्याचे कुटुंबिय तयार नव्हते. पण केतनच्या मित्रांनी समजावल्यानंतर कुटुंबियांनी त्याला परवानगी दिली. केतनने सुद्धा कुटुंबियांचा विश्वास सार्थ ठरवत जगातील सर्वोच्च शिखर सर केले. मोहिम यशस्वी करुन परतलेल्या केतनचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याची केतन जाधवची इच्छा आहे.

मागे

लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ
लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ

लोकमान्य टिकळ टर्मिनस हे मुंबईतील प्रवाशांनी नेहमी भरलेलं स्थानक आहे. मह....

अधिक वाचा

पुढे  

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कपात
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कपात

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समि....

Read more