ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

लातूर मध्ये पावसासाठी देवाला पाण्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 02:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लातूर मध्ये पावसासाठी देवाला पाण्यात

शहर : लातूर

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाडा-विदर्भात ग्रामस्थ पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. पन्नास दिवस उलटून गेले तरी पावसाची चिन्हे नसल्याने लातूरमध्ये वडवळच्या महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथालाच पाण्यात कोंडले आहे.जोपर्यत पाऊस पडत नाही, तोपर्यंत देवाला पाण्यात कोंडून ठेवू, असे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या नावाने जयघोष केला.

पावसाळा अर्धा झाला तरी लातूर मध्ये फक्त 15 टक्केच पाऊस झाला. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यापेक्षा भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात शेतकरी पेरण्यासाठी तयारी करून सज्ज होते, पण पावसाने पाठ फिरवल्याने चढयावर मूठच धरता आली नाही. आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दीर्घकाळ पावसाने खंड पाडल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच त्यांनी ग्राम दैवताला पाण्यात कोंडून साकडे घालण्याचे ठरविले.

मागे

कृत्रिम पावसाचा पहिलाच प्रयोग फसला
कृत्रिम पावसाचा पहिलाच प्रयोग फसला

महाराष्ट्रात काही भागात अद्याप पाऊस फिरकला नाही म्हणून सरकारने कृत्रिम पा....

अधिक वाचा

पुढे  

बिहारमध्ये वीज कोसळून 26 ठार
बिहारमध्ये वीज कोसळून 26 ठार

बिहारमध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत असल्याने त्यामुळे जवळपास बारा जिल्ह....

Read more