ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

Beirut Blast | शक्तीशाली स्फोटात 220 जणांचा मृत्यू, लेबनानच्या पंतप्रधानांसह अख्ख्या मंत्रिमंडळाचा र

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Beirut Blast | शक्तीशाली स्फोटात 220 जणांचा मृत्यू, लेबनानच्या पंतप्रधानांसह अख्ख्या मंत्रिमंडळाचा र

शहर : विदेश

लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे. त्यांनी लेबनानाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर जनतेला संबोधित करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी एक पाऊल मागे येऊन लेबनानच्या नागरिकांसोबत बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचंही नमूद केलं.

 

नुकताच लेबनानची राजधानी बेरुतमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटाने जगाला हदरवलं. त्यात आतापर्यंत 220 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. हसन दियाब म्हणाले, “मी एक पाऊल मागे टाकत आहे. त्यामुळे मला लोकांसोबत त्यांच्या बदलाच्या लढाईत सहभागी होता येईल. मी आज या सरकारमधील माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. ईश्वर लेबनानला सुरक्षित ठेवो.”

बेरुतमधील स्फोटानंतर लेबनानच्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. नागरिकांनी याला सरकारचा बेजबाबदारपणा कारण मानून पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली होती.सरकारवर अकार्यक्षम असल्याचाही आरोप झाला. त्याविरोधात लाखो लेबनन नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सरकारचा जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली.

मागील काही काळात लेबनानवर ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेचं मोठं संकट आलं होतं. त्यातच बेरुतमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर हा जनतेतील असंतोष टोकाला गेला. लाखो नागरिक रस्त्यावर उतरुन पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यातून लेबनान सरकारवर मोठा दबाव वाढला होता. त्यातूनच अखेर हे राजीनामा सत्र झालं.

मागे

अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस
अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस

मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी असा दावा केला की त्यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

महावितरण ग्राहक आहे, मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे : नितीन राऊत
महावितरण ग्राहक आहे, मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे : नितीन राऊत

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण ....

Read more