ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

कोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2020 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल

शहर : मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून 'लॉकडाऊन ४' ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.

लॉकडाऊन ४ संदर्भात आज केंद्रीय गृह विभागाचे निर्देश येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन ४ हा पूर्णपणे नवा असेल असेही ते म्हणाले. यामध्ये अनेक प्रकारचे बदल आणि सवलती दिल्या जातील असेही ते म्हणाले होते.

लस विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपये

भारतातही करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बायोटक्नोलॉजी विभागाच्या माहितीनुसार वैद्यकीय संस्था, स्टार्ट अप यांच्या माध्यमातून लस संशोधनाच्या २५ प्रकल्पांवर भारतात काम सुरु आहे.

काय असतील बदल ?

नागरिकांना स्वत:चे आरोग्य आणि सुरक्षेची काळजी स्वत: घ्यावी लागेल.

केंद्राकडून राज्यांना अनेक गोष्टीत निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल.

ग्रीन झोनमध्ये प्रवास आणि उद्योगांसाठी परवानगी मिळू शकते.

ग्रीन झोनमध्ये बस आणि टॅक्सीसाठी परवानगी मिळू शकते.

प्रवासी ट्रेनला सध्या परवानगी नाही.

स्पेशल ट्रेन आणि श्रमिक ट्रेन पहिल्याप्रमाणे सुरु राहील

१८ मेपासून ठराविक ठिकाणी विमान सेवा सुरु होण्यावर विचार केला जाईल.

 

पुढे  

इतके दिवस मेहनत घेतली, आणखी काही दिवस घरी राहा; आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन
इतके दिवस मेहनत घेतली, आणखी काही दिवस घरी राहा; आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. रा....

Read more