ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा; काय बंद, काय सुरु राहणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2020 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा; काय बंद, काय सुरु राहणार?

शहर : देश

देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील लॉकडाऊन वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) जारी केले आहेत. एनडीएमएने सर्व राज्यांना 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईनुसार -

- हॉटेल बंद राहणार, होम डिलिव्हरीची परवानगी

- 31 मार्चपर्यंत सर्व विमान सेवा बंद राहणार

- मेट्रो सेवा बंद

- मॉल, सिनेमागृह, जीम बंदच राहणार

- 31 मेपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी

- ग्रीन झोन असणाऱ्या त्याच राज्यात बस, टॅक्सी चालविण्याची परवानगी

- स्टेडियम, क्रीडा संकुल उघडणार, परंतु प्रेक्षकांना परवानगी नाही

- राज्यांच्या संमतीने आंतरराज्यीय बस सेवा सुरु करता येऊ शकते

- सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी

- शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार

- रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा निर्णय राज्य सरकार घेईल

- लग्नसमारंभात 50हून अधिक लोक नसावेत

- अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही

त्या-त्या राज्यांतील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार 5 झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन असे 5 झोन असणार आहे.

कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागात शॉपिंग मॉल वगळता इतर दुकानं सुरु करता येऊ शकतात.

 

मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात
बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात

कोरोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेली मुंबईच....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुक्त झालेल्या या राज्यात रेल्वेने आलेले आणखी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनामुक्त झालेल्या या राज्यात रेल्वेने आलेले आणखी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत एकूण कोरोना र....

Read more