ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

शहर : मुंबई

मुंबईत जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचार्‍यांचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने जेटच्या कर्मचार्‍यांमध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान, ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर यांनी हजार कर्मचार्‍यांच्या उपस्थित लाँग मार्च काढला.
जेट कामगारांच्या हक्कासाठी जेटचे चेअरमन, डायरेक्टर आणि मॅनेजमेंट यांच्यावर एफआयआर दाखल करून ते परागंदा होऊ नयेत यासाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करावे या मागणीसाठी आमदार किरण पावसकर यांनी हजारो कर्मचार्‍यांच्या सोबतीने सहार पोलिस स्टेशनला थेट धडक दिली.
यावेळी किरण पावसकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आणि जेट कर्मचार्‍यांच्या बाबतीत सर्व सत्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिस आयुक्तांनी आमदार किरण पावसकर यांना जेट कंपनीच्या कर्मचार्‍यांबाबत पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

मागे

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून
हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना &nb....

अधिक वाचा

पुढे  

गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 
गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 

गडचिरोलीमधील मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर....

Read more