ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मुंबईचे दर्शन ८०० फुटांवरून; ‘लंडन आय’सारखं ‘मुंबई आय’ साकारणार  

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 07:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईचे दर्शन ८०० फुटांवरून; ‘लंडन आय’सारखं ‘मुंबई आय’ साकारणार  

शहर : मुंबई

     मुंबई - राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर पर्यटकांना आकाशातून मुंबईचे विहंगमय दृश्य पाहता येणार असल्याची खुशखबर दिली आहे. लंडनमधील ‘लंडन आय’ च्या धर्तीवर मुंबईहीतही ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार असल्याचं त्यांनी मुंबईकरांना सांगितलं आहे. 


         मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ सुरू होणा-या टोल नाक्याच्या बाजूला हे ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. सीआरझेड व इतर परवानग्यांची अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी ‘मुंबई आय’ करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

         दरम्यान, चार वर्षांपूर्वीदेखील मुंबई महानगरपालिकेचा वांद्रे बॅण्ड स्टँडजवळ १४ हजार स्केअर मीटर जागेवर ‘मुंबई आय’ साकारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, पुरेशा निधीअभावी हा प्रस्ताव पुढे आला नव्हता. परंतु आता हे होणार असून या ‘मुंबई आय’ची जवळपास ८०० मीटर ऊंची असणार आहे. 


       ‘लंडन आय’ हा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असून याची ऊंची १३५ मीटर आहे. तसेच ३१ डिसेंबर १९९९ रोजी पर्यटकांसाठी तो खुला करण्यात आला होता. दरवर्षी ‘लंडन आय’ला जवळपास ३५ लाख पर्यटक भेट देतात.   
 

मागे

चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी
चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी

        वर्धा - पोलिस यंत्रणेत कठीण प्रसंगात लोकांना सेवा पुरवणा-या होम....

अधिक वाचा

पुढे  

आर्मी डे परेडमध्ये कॅप्टन तानिया शेरगिल सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली
आर्मी डे परेडमध्ये कॅप्टन तानिया शेरगिल सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली

15 जानेवारी कोर्प्स ऑफ सिग्नल्सच्या कॅप्टन तानिया शेरगिलने पुरुष-पुरुषांच्....

Read more