ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2020 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

शहर : हिंगोली

राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे सर्व जण मीडियात येऊन माईकसमोर बोलतात. मग प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार? सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी बिलकूल गांभीर्य नाही. सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

जयंत पाटलांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला कोणताही अर्थ राहिलेला नाही. मुख्यमंत्री योग्यप्रकारे काम करत असल्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आम्हाला जयंत पाटलांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला खरखोटं ठरवण्यापेक्षा जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी. अजूनही अनेक भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांनी बोलघेवडेपणा सोडून कृतीवर भर द्यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मागे

सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात, सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी
सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात, सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी

देशातील मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये कट्टरतावाद आणि द्वेषभाव रुजवला जातो. ....

अधिक वाचा

पुढे  

नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, 35 जखमी
नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, 35 जखमी

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटा....

Read more