ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब, मतदान केंद्रावर गोंधळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2021 09:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब, मतदान केंद्रावर गोंधळ

शहर : नाशिक

राज्यात अनेक ठिकाणी आज (15 जानेवारी) ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Elections 2021) होत आहेत. राज्यभरात एकाच टप्प्यात या निवडणुका होत आहे. मात्र, मनमाडमधील पानेवाडी (Panevadi) येथे मतदान यंत्रावरून एका उमेदवाराचे नावच गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. या सर्व गोंधळामुळे येथील निवडणूक प्रक्रिया खोळंबली असून प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून मतदान यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत. विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मागील काही दिवसांपासून उमेदवारांनी जीवाचं रान करुन प्रचार केला आहे. विविध आश्वसनं, जाहीरनामे यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनमाडमधील पानेवाडी येथे ऐन मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नावच गायब झाल्यामुळे येथे गोंधळ उडाला आहे. उमेदवाराने मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्यामुळे येथे गदारोळ झाला आहे. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

हा प्रकार समोर येताच निवडणूक अधिकारी पानेवाडी गावात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मतदान यंत्राची दुरुस्ती सुरु असून लवकरच मदतान प्रक्रिया सुरळीत होईल असे सांगितले जात आहे. मात्र, रात्र आणि दिवस एक करुन प्रचार केल्यानंतर ऐन मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावर नावच नसल्यामुळे उमेदाराकडून संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान, राज्यात सध्या 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. उरलेल्या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मदतान करता येईल. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

बीडमध्ये मतदान यंत्रात बिघाड

धुळे जिल्ह्यातील कावठी येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाली आहे. अचानकपणे मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे येथील मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. मतदान प्रक्रिया थांबल्यामुळे येथे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 

मागे

तबेल्यात अडकलेली पतंग काढताना घात, दलदलीत बुडून मुंबईत चिमुरड्याचा अंत
तबेल्यात अडकलेली पतंग काढताना घात, दलदलीत बुडून मुंबईत चिमुरड्याचा अंत

देशभरात मकरसंक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना मुंबईत गालबो....

अधिक वाचा

पुढे  

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’राजभवन आणि LG ना घेराव घालणार
Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’राजभवन आणि LG ना घेराव घालणार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीच्या सीम....

Read more