ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आक्रोश मोर्चा:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी, मंदिर परिसरात मोठा फौजफाटा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 09:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आक्रोश मोर्चा:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी, मंदिर परिसरात मोठा फौजफाटा

शहर : मुंबई

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे.

पंढरपूर प्रशासनाने केलेलं आवाहन धुडकावत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज बांधव ते पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर ते पाय मुंबई पायी दिंडी काढू नये, यासाठी काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत.

पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे.

                                      

मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च धडकणार

त्याशिवाय, मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज धडकणार आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली

आपल्या मशाली या प्रतीकात्मक असतील.

कायदा सुव्यवस्थेचा आदर करता कृपया खऱ्या मशाली आणू नयेत.

आपापली वाहने नेमून दिलेल्या वाहनतळावर पार्क करून शांततेच्या मार्गाने दिलेल्या नियोजित ठिकाणी जमावे.

मार्चमध्ये फक्त खालील घोषणा दिल्या जाणार

1) जय भवानी जय शिवराय

2) एक मराठा लाख मराठा

3) तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

4) आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.

 

मागे

अतिवृष्टीमुळे नुकसान ,नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
अतिवृष्टीमुळे नुकसान ,नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी मारू....

अधिक वाचा

पुढे  

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्....

Read more