ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मराठा तरुणाच्या 'सुसाईड नोट'वर हस्ताक्षर एक्सपर्टकडून खुलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा तरुणाच्या 'सुसाईड नोट'वर हस्ताक्षर एक्सपर्टकडून खुलासा

शहर : बीड

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे विवेक रहाडे याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही सुसाईड नोट हस्ताक्षर एक्सपर्टकडे पाठवली होती. हस्ताक्षर एक्सपर्टचा अहवाल आता आला असून ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. बीड पोलीस अधीक्षक रामा राजा स्वामी यांनी प्रसार माध्यमाना यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हे पत्र ट्वीट करत महाराष्ट्र सरकारला सहाय्य करण्याचे आवाहन केले होते.

विवेक रहाडेच्या आत्महत्येला सरकार वेगळं वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पीडित कुटुंबावर सरकार दडपशाही करत असेल तर कदापिही मराठा समाज सहन करणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी म्हटले राज्य सरकार विषयाला डायव्हर्ड करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोशला समोर जावं लागेल असा धमकी वजा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिला. आज आमच्या तरुण युवकांनी बलिदान दिले. त्या बलिदाच्या विषयाला डायव्हर्ड करत असाल तर कदापिही मराठा समाज खपून घेणार नाही सरकारला महागात पडेल असेही ते म्हणाले.

विवेक राहाडेची कथित सुसाईट नोट नकली असल्याचे पोलिसांनी म्हटलंय. तर विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस दडपशाही करत असून ते खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे.

पोलिसांनी तपासात केलेल्या दाव्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय आणि पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयक असा नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

 

मागे

जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन
जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन

देशात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनावर लसीच्या संदर्भात महत्वाची माहित....

अधिक वाचा

पुढे  

सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती
सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती

कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याच काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिस....

Read more