ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार, अमेरिकन मीडियाचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2020 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार, अमेरिकन मीडियाचा दावा

शहर : विदेश

अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडून घटस्फोट देऊ शकतात, अशा बातम्या अमेरिकन माध्यमात येत आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, मेलानिया ट्रम्प यांना काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देतील असं बोललं जात आहे. मेलानिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.

अमेरिकेतील माध्यमांतील वृत्तांनुसार, मेलानिया घटस्फोटासाठी तयार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया त्यांचं 15 वर्षांचं लग्नाचं नातं मोडू शकतात. दोघांनी 2005 साली लगीनगाठ बांधली होती. मेलानिया यांच्या माजी सहकारी स्टेफनी वोल्कॉफ यांनी हे दावे केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत, मात्र पराभव ते अद्यापही मान्य करत नाहीत. ट्रम्प यांचे माजी राजकीय सहयोगी ओमरोसा न्यूमन यांनी असा दावा केला आहे की ट्रम्प आणि मेलानिया यांचं 15 वर्षांचं वैवाहिक नातं आता संपलं आहे. ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधून बाहेर आल्यावर लगेचच मेलानिया ट्रम्प यांना घटस्फोट देतील.

ओमरोसा यांनी असा दावा केला की, आता मेलानिया ट्रम्प यांचा सूड घेण्यासाठी मार्ग शोधत आहेत. डेली मेलच्या त्याच अहवालात मेलानियाचे माजी सहकारी स्टेफनी यांनी असा दावा केला आहे की, लग्न झाल्यापासून मेलानिया ट्रम्प यांच्याशी चर्चा करत आहेत. ट्रम्प यांच्या मालमत्तेत त्यांचा मुलगा बेरॉन यांच्यासह समान भागभांडवलाची मागणी त्या करत आहेत.

ट्रम्प आणि मेलानिया यांच्या व्हाईट हाऊसमध्ये स्वतंत्र बेडरूम असल्याचेही स्टेफनीने उघड केले. त्यांनी ट्रम्प आणि मेलानियाच्या लग्नाला करार म्हणून संबोधले आहे. वृत्तानुसार, लग्नाआधी, मेलानिया यांना ट्रम्पच्या आधीच्या दोन पत्नींप्रमाणेच अशा करारावर स्वाक्षरी करावी लागली होती, ज्यात असं लिहिलं होतं की त्यांचा घटस्फोट झाला तर त्या ट्रम्प यांच्या मालमत्तेत काही हिस्सा मागणार नाहीत.

मागे

Corona 'सुपर स्प्रेडर'वर इतकं का लक्ष? Super Spreader म्हणजे नेमकं कोण?
Corona 'सुपर स्प्रेडर'वर इतकं का लक्ष? Super Spreader म्हणजे नेमकं कोण?

जसजशी दिवाळी जवळ येऊ लागली आहे, राज्यातील नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने ....

अधिक वाचा

पुढे  

ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन
ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन

राज्यात आलेली थंडीची लाट आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या पार्श्वभूमीवर म....

Read more