ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर

शहर : देश

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेतकाही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडूंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

कोविड विषाणू नियंत्रणासाठी सूचना

- मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.

- सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.

- ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

- जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला ५० पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना २० पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.

सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू . चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना- :

 घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.

कार्यालये, कामाची जागा, दुकानेबाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.

तपासणी स्वच्छता - कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.

संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

सुरक्षित अंतर : कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, याआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात येत आहे. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील.

या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील.

ऑगस्ट २०२० पासून सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल.   

अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी -कॉमर्स व्यवस्था सुरु राहील. सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खासगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील. होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील. ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील.

सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.

स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील. गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल

 

मागे

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल से....

अधिक वाचा

पुढे  

अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या
अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा ....

Read more