ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

शहर : मुंबई

मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 11 तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई सेंट्रलजवळील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्री सुमारे 8 वाजून 53 मिनिटांनी आग लागली. एका दुकानात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यानंतर हवेमुळे ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. त्यामुळे सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील दुकानही आगीच्या कचाट्यात सापडली आहेत.

या आगीचं भीषण रुप पाहता अग्निशमन दलाकडून लेव्हल 5 ची आग असल्याचं जाहीर करण्यात आलं. अग्निशमन दलाकडून 24 बंब आणि 11 टँकरद्वारे ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 250 अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या 55 मजली इमारतीतील अंदाजे 3 हजार 500 रहिवाशांचे जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोड हा दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

 

पुढे  

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

पुण्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यव....

Read more