ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने दाखवला रेड सिग्नल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने दाखवला रेड सिग्नल

शहर : मुंबई

शिवसेनेचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने रेड सिग्नल दाखवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील कोस्टल प्रकल्पासाठी मंजुरी रद्द केली आहे. काही संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर या प्रकल्पाची मंजुरी रद्द केली आहे. त्यामुळे आता नव्याने कोस्टल रोडचे काम करता येणार नाही.

कोस्टल रोड प्रकल्पाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १४ हजार कोटी रूपये आहे. या प्रकल्पाअंतर्गत मरीन ड्राईव्ह आणि बोरीवली जोडण्यात येणार होते. या कोस्टल रोडची लांबी २९.०२ किलोमीटर आहे. कोस्टल रोडविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. जुलै रोजी सगळ्यांच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायालयाने कोस्टल रोडच्या नव्याने होणाऱ्या कामाला मनाई केली आहे.

कोस्टल रोड प्रकल्प पुढे न्यायचा असेल तर मुंबई महापालिकेला नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने परवानग्यांची पूर्तता नसल्याचे सांगत सीआरझेड हटवण्याबाबत दिलेली परवानगी उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोस्टल रोडचे भवितव्य कठीण असल्याचे दिसून येत आहे.

मागे

खंडग्रास चंद्र्ग्रहण आज भारतात दिसणार
खंडग्रास चंद्र्ग्रहण आज भारतात दिसणार

आज गुरुपौर्णिमा असून खंडग्रास चंद्रग्रहण आहे. रात्री उशिरा ३ तास हे खंडग्र....

अधिक वाचा

पुढे  

शिर्डीत तूफान गर्दी: चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद
शिर्डीत तूफान गर्दी: चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद

शिर्डीत ३ दिवस चालणार्‍या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरवात झाल....

Read more