ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

शहर : मुंबई

कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. मात्र, वाढणारी गर्दी लक्षात रेल्वे प्रशासनाने  ‘क्यु-आरकोड प्रणाली लागू केली आहे.  ‘क्यु-आरकोड पास असेल तरच अत्याश्यक सेवेत काम करणाऱ्यांना यापुढे लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी ३० जुलैची डेटलाईन देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून होणारा विलंब लक्षात घेता हीक्यु-आरकोडची मुदतवाढ १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला ये - जा करण्यासाठी विशेष लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठीक्यु-आरकोडचा आधारित पास सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती एकत्र करण्यात राज्य सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सध्याच्या सुविधाप्रमाणे प्रवासास संधी देण्यात आली आहे. मात्र, १० दिवसानंतर  क्यूआर कोड शिवाय प्रवास करता येणार नाही.

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेरील अत्यावश्यक प्रवाशांसाठी हा 'क्यूआर कोड' पास बंधनकारक असणार आहे. त्यानुसार हाक्यु-आरकोडबाबत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु करण्याचे ठिकाण, कार्यालयाच्या वेळा आणि अन्य तपशील यांची माहिती एकत्र करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केलेय. परंतु कमी कर्मचाऱ्यांमुळे हे काम त्वरीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा पास मिळेपर्यंत ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

मागे

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा
घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा

कोरोना प्रादुर्भाव आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापालिका आणि ....

अधिक वाचा

पुढे  

मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर
मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० ....

Read more