ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिवाळीच्या उत्साहात लक्षात असूद्या 'हे' नियम, नाहीतर होईल कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिवाळीच्या उत्साहात लक्षात असूद्या 'हे' नियम, नाहीतर होईल कारवाई

शहर : नागपूर

अगदी दोन दिवसांवर दिवाळी (Diwali) हा सण आला असताना कोरोनाचा (Corona) धोका काही कमी झाल्याचं दिसत नाहीये. यामुळे दिवाळीच्या उत्सवाह अधिक काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून (State Government) करण्यात आलं आहे. अशात दिवाळी साजरी करताना कोव्हिड- 19 चे नियम पाळणं बंधनकारक असल्याचं आदेशही नागपूर मनपा आयुक्त बी राधाकृष्ण यांनी दिले आहेत. यामुळे आपली काळजी घेत आणि नियमांचं पालन करत यंदाची दिवाळी साजरी करायची आहे.

फटाके टाळा, मियम पाळा

यंदाच्या प्रत्येक सणावर कोरोनाचं संकट आहे. यामुळे नागरिकांनी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ‘फटाके टाळा, मियम पाळा असं धोरण आखत नागपूर मनपा आयुक्तांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या दिवाळीसाठी काही नियमावली जारी करण्यात आली आहे.

यानुसार, सायलेंट झोनमध्ये फटाके फोडण्यासाठी सक्त मनाई आहे. फटाके, दिवे लावताना सॅनिटायझर ऐवजी साबन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विना परवानगी कार्यक्रम आयोजित केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सर्वजण सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे यंदाची भाऊबीज ही भावाच्या घरी जाऊन साजरी न करता ऑनलाईन पद्धतीने साजरी करावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.

दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी

कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास बंदी घातली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलबाजा, अनार फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवा, असेही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. दिवाळीसाठी घरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला हात, पाय आणि चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल. सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना यात नमूद करण्यात आली आहे.

पुढे  

दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी
दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी

दिवाळीच्या काळात मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास उच्च न्यायालयाने परवान....

Read more