ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नालेसफाईच्या कामावरुन पहारेकर्‍यांनी मनपा सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नालेसफाईच्या कामावरुन पहारेकर्‍यांनी मनपा सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले

शहर : मुंबई

मतदान आटोपताच पहारेकर्‍यांनी पुन्हा सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात महापालिकेने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कामाची भाजप झाडाझडती घेणार आहे. शिवसेनेवर कुरघोडी करणार्‍या या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
लोकसभेची रणधुमाळी संपताच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणुकीच्या कामाचे कारण सांगून पालिका अधिकार्‍यांनी नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते आहे. त्याचा फायदा ठेकेदारांनी घेत अद्याप कामाला वेग दिलेला नाही, या झालेल्या विलंबाचा आयुक्तांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. मुंबईभर नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी सर्व भाजप नगरसेवकांना देत शिवसेनेला अडचणीत आणले आहे.


वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जुहू या उपनगराच्या पश्चिमेकडील भागात पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदरबांध येथील नालेसफाईची कामे वेळीच पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याचबरोबर गझदरबांध येथे बांधण्यात येणाजया पंपिंग स्टेशनचे कामही अपूर्ण आहे. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या नागरी भागासह पश्चिम रेल्वेला पुराचा फटका बसतो. येथील चार प्रमुख नाल्यांच्या सफाईच्या कामाची व पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी भाजपने आज केली. ही मोहीम सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मागे

आर. के. स्टुडिओच्या जागी बांधले जाणार आलिशन बंगले
आर. के. स्टुडिओच्या जागी बांधले जाणार आलिशन बंगले

चेंबूर येथे उभ्या असलेला आर. के. स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने विकत....

अधिक वाचा

पुढे  

चांदवड तालुक्यात ‘जलयुक्त’साठी श्रमदान करणार्‍यांवर आदिवासींचा हल्ला
चांदवड तालुक्यात ‘जलयुक्त’साठी श्रमदान करणार्‍यांवर आदिवासींचा हल्ला

मतेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या ’वॉटर कप’ स्पर्धे....

Read more