ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, 35 जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2020 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, 35 जखमी

शहर : नंदूरबार

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावहून सुरतकडे जात असताना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील दर्ग्या जवळील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवासी गंभीर आहेत.

प्राथमिक माहितीनुसार खाजगी ट्रॅव्हल्समध्ये अंदाजे 40 प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात हा रात्री दोन ते अडीच दरम्यान असल्याने प्रवासी झोपेत होते. दरम्यान अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा , नंदुरबार, पिंपळनेर, दहिवेल येथील 108 रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम रुग्णवाहिकांद्वारे सुरू आहे..

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

मागे

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल
सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या मा....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक
मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

प्रजा फाऊंडेशनकडून मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं चालू कार्यकाळातील ‘प....

Read more