ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याच

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याच

शहर : विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

पंतप्रधानांनी आपल्या 2015च्या मंगोलिया दौऱ्यात या बौद्ध मठात प्रार्थना केली होती आणि दोन्ही देशांना लाभलेला बौद्ध वारसा, संस्कृतींमधील संबंध, नागरिकांमधले दुवे अधोरेखित करत भगवान बुद्धांच्या पुतळ्याच्या भेटीची घोषणा केली होती.

भगवन बुद्ध बसलेले असून, आपल्या दोघा शिष्यांना शांती आणि सहअस्तित्वासह दयेचा संदेश देत आहेत, असे दर्शवणारा हा पुतळा आहे. उलानबटोर इथे 6 आणि 7 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या तिसऱ्या संवादकार्यक्रमात हा पुतळा गंदान बौद्धमठात स्थापित करण्यात आला. संवाद कार्यक्रमात विविध देशातले बौद्ध धर्माचे अभ्यासक, तज्ज्ञ, धार्मिक नेते बौद्ध धर्माशी संबंधित वर्तमान मुद्यांवर चर्चा करतात.

मंगोलियातील बौद्ध धर्मियांसाठी हा मठ मोठा वारसा असून, महत्वाचे केंद्र आहे. 21 ते 23 जून 2019 दरम्यान एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीसच्या 11व्या महासभेचे यजमानपद मठाने भूषवले होते. भारतासह 14 देशांमधले 150 हून अधिक अतिथी या महासभेत सहभागी झाले होते.पंतप्रधान आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी एकत्रितपणे केलेले पुतळ्याचे अनावरण, हे भगवान बुद्धांच्या वैश्विक संदेशाचा दोन्ही देश करत असलेल्या आदराचे प्रतिक आहे.

 

मागे

9 ऑक्टोंबरपासून बेस्ट कर्मचार्‍यांचा बेमुदत संप
9 ऑक्टोंबरपासून बेस्ट कर्मचार्‍यांचा बेमुदत संप

बेस्टमधील कामगार संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कामगार कर्मचार्‍यां....

अधिक वाचा

पुढे  

आता मुंबईतही ‘ती’ टॉयलेट
आता मुंबईतही ‘ती’ टॉयलेट

पुण्याच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने महिलांसाठी ‘ती’ स्वच्छतागृह सुर....

Read more