ठळक बातम्या दर रोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे कळल्यावर कधीच कंटाळा करणार नाही.    |     थंड हवामानात निरोगी राहण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा.    |     मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय.    |     Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त.    |     धनतेरसला धणे का विकत घेतात? जाणून घ्या.    |    

National Youth Day | 12 जानेवारीला देशभरात साजरा केला जातो ‘राष्ट्रीय युवा दिन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

National Youth Day | 12 जानेवारीला देशभरात साजरा केला जातो ‘राष्ट्रीय युवा दिन

शहर : देश

देशभरात 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. पोर्तुगाल देशातील लिस्बन येथे ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस युवा दिन म्हणून जगभरातही साजरा करण्यात येतो.

भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

यामागचा इतिहास काय?

महान, आध्यात्मिक आणि तत्वज्ञानी नेते स्वामी विवेकानंद यांच्या वाढदिवसा दिनी देशातील तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने 1984पासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आहे.

आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे. खेळापासून बॉलिवूडपर्यंत सगळ्याच क्षेत्रात तरूणांचे वर्चस्व आहे. भारतीय राजकारणातही तरुण पुढे येत आहेत. तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या शक्तीला एकवटून आपले सरकार स्थापन केले आहे. तरुण पिढीने त्यांना उघडपणे मतदान केले होते. आज सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर तरुण मंडळी करतात. फॅशन ट्रेंड असो की बदलती जीवनशैली या सगळ्यातच तरूण पिढीचे वर्चस्व आहे.

निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांची!

सळसळत्या रक्ताची तरुण पिढी खूप दमदार आहे. तरुणांमध्ये बरेच काही करून दाखवण्याची क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात तरुण मंडळी आपला गौरव मिरवत आहेत आणि जगभरात भारताचे नाव मानाने उंचावत आहेत. आज केवळ तरुणच समाज आणि देशाचे भविष्य बदलू शकतात. कुटुंब, समाज आणि देशाची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर आहे. भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या तरुणवर्गाची आहे.

देशातील विकासाला स्वत:हून वेग मिळावा यासाठी सरकार तरुणांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे. तरुणांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्येही अनेक उपक्रम राबविले जातात. कोणत्याही देशातील तरुणांना त्या देशाचा ‘भविष्यकाळातील निर्माते म्हटले जाते. भारताकडून शिकून आज अनेक देश आपल्या देशातील तरूणांची प्रगती व्हावी यासाठी ठोस पावले उचलत आहेत.

 

मागे

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात ‘पेपरलेस बजेट’ सादर होणार, अर्थ मंत्रालयाचा निर्णय
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात ‘पेपरलेस बजेट’ सादर होणार, अर्थ मंत्रालयाचा निर्णय

येत्या 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्....

अधिक वाचा

पुढे  

अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष
अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

भारतात कोरोनावरील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्....

Read more