ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 15, 2020 09:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू

शहर : नाशिक

एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यांच्या गाडीला अचानक आग लागली. त्यांनी गाडी बाजुला घेतली आणि उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी लॉक झाल्याने ते कारमध्येच अडकले. या कारने पेट घेतल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. दरम्यान, कारला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील नाशिकमधील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. संजय शिंदे यांच्या कारला आग मुंबई-आग्रा महामार्गावरुन जात असताना लागली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत संजय शिंदे यांना मृत्यू झाला.

संजय शिंदे हे द्राक्ष निर्यातदार व्यापारी

संजय शिंदे हे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ ही दुर्घटना घडली. शिंदे किटकनाशके खरेदी करण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना कारला अचानक आग लागली. वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या कारला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारच्या आत सॅनिटायझरची बाटली

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आगीनंतर संजय शिंदे यांनी कार थांबवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही, कारण कारचे दरवाजे लॉक झाले होते. त्यानंतर वेगाने आग पसरली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. "आम्हाला गाडीच्या आत हँड सॅनिटायझरची (Hand Sanitizer) एक बाटली सापडली. आम्हाला असा संशय आहे की, ही आग सॅनिटायझर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असावी."

 

मागे

मुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

शहर आणि मुंबई उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. जो....

अधिक वाचा

पुढे  

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर
टीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिं....

Read more