ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

2 दिवसात 1.41 कोटीची कमाई

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2 दिवसात 1.41 कोटीची कमाई

शहर : delhi

नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आल्यानंतर तब्बल 1.41 कोटी रूपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. हरियाणा आणि ओडिसा या राज्यातून केवळ चार दिवसांत एक कोटी 41 लाख 22 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतुकीचे नियमभंग होण्याच्या प्रकारांना चाप बसावा या उद्देशाने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे.

हरियाणामध्ये 343 जणांकडून सुमारे 52 लाख 32 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे 3900 जणांवर कारवाई केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ओडिशा राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे 4080 चलनांद्वारे 88 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

मागे

मदतीला उभ्या राहिलेल्या रिक्षावाल्याला कोर्टाच्या फेर्‍या
मदतीला उभ्या राहिलेल्या रिक्षावाल्याला कोर्टाच्या फेर्‍या

पालघर स्थानकात एका वृद्ध व्यक्तिला अत्यव्स्थ वाटत असल्याने त्याच्या सोबत ....

अधिक वाचा

पुढे  

साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन
साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

यांचे काल रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसा....

Read more