ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भया: पुनर्विचार याचिका फेटाळली; गुन्हेगारांना फाशीच

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भया: पुनर्विचार याचिका फेटाळली; गुन्हेगारांना फाशीच

शहर : देश

        नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याच अखेर स्पष्ट झालं आहे. फाशीच्या शिक्षेवर विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग अवलंबत सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल केली होती. 


        परंतु पुनर्विचार याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांच्यासह चारही आरोपींना अखेर फाशीच देण्यात येईल. पटियाला न्यायालयाने ७ जानेवारीला चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.  

 
          आता दोषींकडे याचिका फेटाळल्यानंतर एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा. राष्ट्रपती राज्यघटनेतील अनुच्छेद – ७२ आणि राज्यपाल अनुच्छेद -१६१ नुसार दया याचिकेवर सुनावणी घेवू शकतात. तर राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडून अहवाल मागवतात. मंत्रालयाकडून राष्ट्रपतींना शिफारस पाठवली जाते. व त्यानंतर राष्ट्रपती दया याचिका निकाली काढतात. जर राष्ट्रपतींनी याचिका फेळाळली तर गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा होतो. आणि जर याचिका निकाली काढण्यास विनाकारण उशीर झाला तर त्याआधारे गुन्हेगार पुन्हा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू शकतात. 


            दरम्यान, हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. गेल्या सात वर्षापासून मी न्यायासाठी संघर्ष करत आहे. येत्या २२ जानेवारीला आरोपींना फासावर लटकावले जाईल आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.     

मागे

जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर
जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर

            पुणे : पुढच्या महिन्याच्या ९ फेब्रुवारीला पुणे ते बेळगाव दर....

अधिक वाचा

पुढे  

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; गोकुळ दूध दरात वाढ  
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; गोकुळ दूध दरात वाढ  

       कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैशीच्....

Read more