ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘या’ व्यक्तीमुळे जगात ‘कोरोना व्हायरस’ची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2020 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘या’ व्यक्तीमुळे जगात ‘कोरोना व्हायरस’ची लागण

शहर : विदेश

जगात धुमाकूळ घालणाऱ्या 'कोरोना व्हायरस'ची  धडकी अनेकांना बसली आहे. चीनने तर मोठा धसका घेतला आहे. मात्र, या 'कोरोना व्हायरस'चा प्रसार कसा झाला याचा उलगडा झाला आहे. ज्या व्यक्तीने या 'कोरोना व्हायरस'चा प्रसार केला ती व्यक्ती लंडनमध्ये उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे. याच व्यक्तीने अनेक देशात 'कोरोना' पसरविण्यात हातभार लावला. त्यांच्यामुळेच कोरोना अनेक देशांमध्ये पोहोचल्याचे सांगितले जाते. याबात 'सीएनएन'ने वृत्त दिले आहे. ब्रिटीश व्यक्तीशी कोरोनाची लिंक लागल्याचे वृत्तात म्हटले आहे. आता ती व्यक्ती पूर्णपणे रिकव्हर झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला असून त्याचे नाव स्टिव्ह वॉल्श आहे. त्यांच्यामुळेच कोरोना अनेक देशांमध्ये पोहोचल्याचे सांगितले जाते. स्टिव्ह यांच्या माध्यमातून कोरोना अनेक देशांत पसरल्याने त्यांनासुपर स्प्रेडर असे म्हटले जात आहे. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती ब्रिटनमध्ये असल्याचा संशय होता. त्यामुळे याबाबत कसून शोध घेण्यात येत होता. स्टिव्ह वॉल्श हे लंडनमधील एका रुग्णालयात उपचार घेत असताना सापडले. त्यांच्यामुळेच कोरोना इतर देशात पसरला आहे, असे म्हटले जात आहे. त्यांच्यामुळे जणांना त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, स्टीव्ह वॉल्शने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्याने आपले नाव उघड केले आणि युकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने मदत आणि काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

स्टिव्ह वॉल्श जानेवारीत ब्रिटनमधील गॅस नलिटिक्स कंपनी सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला गेले होते. तिथेच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. त्यानंतर सिंगापूरमधील एका परिषदेलाही ते गेले. या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना व्हायरस आढळला. याच मलेशियन व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दक्षिण कोरियाच्या दोघांना कोरोनाची बाधा झाली, असे म्हटले जात आहे.

तसेच परिषदेला उपस्थित असलेल्या आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली. परिषद संपल्यानंतर स्टिव्ह पत्नीसोबत फ्रान्समध्ये सुट्टीवर गेले. त्याआधी त्यांच्या संपर्कात आलेल्या ब्रिटनमधल्या चार मित्रांना कोरोनाची बाधा झाली होती. फ्रान्समध्ये सुट्टी घालवत असताना स्टिव्ह त्यांच्यासोबत ब्रिटनमधलेच पाच जण होते. त्यांच्या शरीरातही कोरोनाच्या विषाणूने प्रवेश केला, असे सांगितले जात आहे.

मागे

कोरोना व्हायरस मागे दडलेलं रहस्य
कोरोना व्हायरस मागे दडलेलं रहस्य

संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे ....

अधिक वाचा

पुढे  

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन
वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या इंद....

Read more