ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कांद्याने केली शंभरी पार

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांद्याने केली शंभरी पार

शहर : मुंबई

परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि इतर राज्यातील शेतीच्या उत्पादनाला जबरदस्त फटका बसलाय. टोमॅटो, कोथिंबीरी व अन्य भाज्यांचे दरही आवक घटल्याने वाढले आहेत. कांदा कोथिंबीरीने शंभरी गाठली आहे. त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा असा सवाल सर्व गृहिणींना पडला आहे.

कांदा, कोथिंबीर, टोमॅटोचे दर आवाक्याबाहेर गेलेत. हे घटक नसतील तर जेवणाची चवच बिघडते. कांदा आणि कोथिंबीरीचे दर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतात. परदेशातून कांदा आयात करण्यात येत असला तरीही त्याचे दर स्थिर राहिलेले दिसत नाहीत. नाशिक व सिन्नरमधून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येतो, पण परतीच्या पावसाने तेथे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याची आवक घटलीय. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. हॉटेलमध्येही ग्राहकांच्या थाळीतून कांदा गायब झाल्याचे दिसून येत असून लवकरच या स्थितीत बदल होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

मागे

एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?
एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?

महाराष्ट्र राजया मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी बोरीवल....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निकाल: न्यायमूर्तींनी बोलावली आज दुपारी १२ वाजता महत्त्वाची बैठक
अयोध्या निकाल: न्यायमूर्तींनी बोलावली आज दुपारी १२ वाजता महत्त्वाची बैठक

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकत....

Read more