ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहणार नाही, हे आधीच सांगितलं होतं; पंकजा मुंडेंचं ट्विट!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 09:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहणार नाही, हे आधीच सांगितलं होतं; पंकजा मुंडेंचं ट्विट!

शहर : बीड

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे या आधीच सांगितले होते, असे स्पष्टीकरण देत पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चंद्रकांत पाटील आणि माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ते माझ्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. आमच्या छान गप्पाही झाल्या. यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही माझे त्यांच्याशी बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते.” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे. औरंगाबाद दौर्‍यानंतर चंद्रकांत पाटील थेट बीड जिल्ह्यात पोहोचले. येथे आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केलं. भव्यदिव्य असा सत्कारही केला. पण यावेळी पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पंकजा मुंडे राहतील असं वाटलं होतं; मात्र काही कामानिमित्त त्या अनुपस्थित आहेत, अशी माहिती बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली होती.

चंद्रकांत पाटलांच्या या दौऱ्यावेळी पंकजा उपस्थित राहील्या नसल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा नाराज नाहीत, असं त्यांनी सांगितलं. बैठकीला येऊ शकणार नसल्याचं त्यांनी मला मेसेज करून कळवलं होतं. हवं तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता, असं पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनतर पंकजा यांनी ट्विट करत मी उपस्थित राहू शकणार नाही हे चंद्रकांत पाटलांना आधीच सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण देऊन त्यांच्या नाराज असण्याच्या अफवांमधील हवा काढून घेतली आहे.

पुढे  

ना फटाके, ना हलगर्जी, दुसरी लाट थोपवण्यास BMC सज्ज, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
ना फटाके, ना हलगर्जी, दुसरी लाट थोपवण्यास BMC सज्ज, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2020) सण आल्याने मुंबईतील मार्केटमध्ये खरेदीस....

Read more