ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण...

शहर : परभणी

परभणीतील मानवत तालुक्यातील शेवडी येथे मतदारांना सूचना करण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलीय. तसेच पोलिसांच्या जीपचीही तोडफोड केलीय. यामध्ये पोलिस उपनिरिक्षक जखमी झाले आहेत. तर, या प्रकारामुळे शेवडी येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे. शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते. पोलिसांनी मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या तसेच मोबाईलवर न बोलण्याच्या सूचना केल्या. यावरून मतदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला.  या वादातून ग्रामस्थांनी पोलिसांना मारहाण केली, तसेच त्यांच्या गाड्याही फोडल्या आहेत. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याशी संपर्क केला असता घटना घडल्याचा दुजोरा त्यांनी दिलाय. 

 

मागे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आई गंगुबाई शिंदे यांचं निधन
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची आई गंगुबाई शिंदे यांचं निधन

शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची आई गंगुबाई शिं....

अधिक वाचा

पुढे  

जेटचे अमृतसरहून दिल्लीत शेवटचे उड्डाण, 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात
जेटचे अमृतसरहून दिल्लीत शेवटचे उड्डाण, 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटांत असलेली जेट एअरवेज आज अधिकृतरित्या ....

Read more