ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गर्दी करु नका, राज्यात २४ तास दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 07:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गर्दी करु नका, राज्यात २४ तास दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

वैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, महापालिका आयुक्त आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीत सामाजिक अंतर देखील राखले गेले. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली गेली.

दरम्यान, लॉकडाऊन ही संकल्पना लोकांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचा भीतीमुळे गोंधळ झाला. म्हणून लोकांनी भाजीपाला आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे शासनाने काही नियम कडक केले आहोत. भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू आहे; त्याची यंत्रणा सरकारने उभी केली आहे. पहिल्या दोन दिवसात संभ्रम निर्माण झाला. ग्राहकाने घबराहटीने गर्दी केली. आता सगळे सुरळीत होईल, असा विश्वास सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

मागे

कोरोना झाल्याच्या भीतीने सरकारी कर्मचाऱ्याची आत्महत्या
कोरोना झाल्याच्या भीतीने सरकारी कर्मचाऱ्याची आत्महत्या

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वा....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री
कोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री

राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. म....

Read more