ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

PM Care : पीएम केअरला अडीच लाख रुपये दिले पण मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही; गुजरातच्या व्यक्तीची खंत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 26, 2021 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

PM Care : पीएम केअरला अडीच लाख रुपये दिले पण मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही; गुजरातच्या व्यक्तीची खंत

शहर : देश

देश कोरोनाविरोधात लढाई लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आणि आपण पीएम केअरला दोन लाख 51 हजार रुपये मदत केली. पण स्वत: च्या आईला कोरोना झाला असताना मात्र तिला कुठेही बेड मिळाला नाही, शेवटी तिचा जीव गेला अशी खंत गुजरातमधील विजय पारिख या व्यक्तीने व्यक्त केली आहे.

विजय पारिख यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी 2,51,000 रुपये पीएम केअरला दिल्याचे सर्टिफिकेटही शेअर केलं आहे. विजय पारिख आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना म्हणाले की, "अडीच लाखांची मदत केली तरी माझ्या मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मी अजून किती रुपये दान केलं पाहिजे, ज्यामुळे माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना बेड मिळेल, ज्यामुळे त्यांचा जीव जाणार नाही."

विजय पारिख यांनी हे ट्वीट करताना त्यामध्ये पंतप्रधान कार्यालय, राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्मृती इराणी आणि राष्ट्रपती भवनला टॅग केलं आहे.

आपल्यासारखे या देशात अनेक असल्याचं सांगत विजय पारिख यांनी सांगितलंय की, पैसा हा मुद्दाच नाही, जर पैशाने इतर रुग्णांना सुविधा मिळत असतील तर मी माझी सर्व संपत्ती दान करायला तयार आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी, बेड्सच्या अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीएम केअरला लाखो रुपये देऊनही अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाचवाता आलं नाही.

मागे

7 मे च्या अध्यादेशानुसार पदोन्नती कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून असेल : हायकोर्ट
7 मे च्या अध्यादेशानुसार पदोन्नती कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून असेल : हायकोर्ट

राज्य सरकारनं पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वांसाठी खुला ....

अधिक वाचा

पुढे  

Twitter India Office Raid : ट्विटर इंडियाच्या कार्यालयात धडक मोहीम करुन दिल्ली पोलिसांच्या हाती काय
Twitter India Office Raid : ट्विटर इंडियाच्या कार्यालयात धडक मोहीम करुन दिल्ली पोलिसांच्या हाती काय

कोरोनाचं संकट आजूबाजूला असताना दिल्ली पोलिसांच्या तत्परतेची वाटचाल भलत्य....

Read more