ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2020 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा

शहर : देश

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. ही बैठक दोन टप्प्यात पार पडणार आहे. यात एका टप्प्यात मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा करतील. तर दुसऱ्या टप्प्यात सर्व राज्यात कोरोना लसीच्या वितरणाची तयारी यावर चर्चा केली जाईल. त्यामुळे या बैठकीवर देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात ज्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, ते मुख्यमंत्री सहभागी होतील. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

या विषयावर होणार चर्चा

या बैठकीत प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लस वितरणाच्या धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. या बैठकीला मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधीही उपस्थित असतील, अशी माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी अनेकदा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी बैठका घेतल्या  आहेत. या बैठकीत कोरोना या महत्त्वाच्या मुद्द्यावरच चर्चा झाली.

लॉकडाऊन वाढवणार का?

राज्यासह देशामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करायचा का, या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मागे

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार
रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा अखेर 23 नोव्हेंबर (Maharashtra Schools Re-Open) ....

Read more