ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम

शहर : सांगली

महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीही 4 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये ‘आमचे चुकतंय अशी  प्रांजळपणे कबुली दिली चावली आहे. (Political leaders Do not take Serius Corona Says Minister Vishwajeet Kadam)

दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावत नाही.. खरं तर ही आमची मोठी चूक आहे.. आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी  कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील  खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उदघाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर विश्वजित कदम यांनी उत्तर दिलं.

सर्वसामान्यांना लस द्यायला आणखी वेळ लागेल

महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागांत तर लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार  करत आहे.सध्या राज्यात जरी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री

पुन्हा जरी कोरोना वाढतोय हे  चित्र खरे असले तरी राज्य सरकार कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांना लोकांची साथ हवी आहे. कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री असल्याचंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ नाही

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ सरकार करतेय, असा आरोप हा चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यावर बोलताना विरोधकांवी  केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

अधिवेशन किती दिवस घ्यायचे याचा निर्णय समिती घेते

मागे कोरोनाच्या काळात जे अधिवेशन झाले त्यावेळी सर्व आमदारांना आणि त्याच्या खासगी कर्मचाऱ्यांना अधिवेशनाला येण्यापूर्वी  कोरोना टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.यात 288 पैकी 78 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, अधिवेशन हे होणारच आहे पण अधिवेशनाचा कालावधी किती असावा ही समिती ठरवत असते. 25 तारखेच्या पुढे अधिवेशन किती दिवस घ्यायचे हा देखील निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

मागे

लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली
लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली

कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

‘आरोपांवर उत्तर द्यायला हजर व्हा’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमधील न्यायालयाचं सम
‘आरोपांवर उत्तर द्यायला हजर व्हा’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमधील न्यायालयाचं सम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने समन्स ....

Read more