ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

अवकाळी हवामानाचा द्राक्षाला फटका

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अवकाळी हवामानाचा द्राक्षाला फटका

शहर : नाशिक

              नाशिक - अवकाळी पावसामुळे आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यांमध्ये द्राक्षबागांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे निर्यातीवरही विपरीत परिणाम होणार आहे. तसंच द्राक्षांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे  द्राक्ष बागांना मोठा फटका बसतोय. फुलोऱ्यातील बागांचे घड कुजले आहेत तर शंभर टक्के द्राक्षांच्या मण्यांना तडे गेलेत. त्यामुळे निर्यातीला आवश्यक असलेला दर्जा द्राक्षांमध्ये दिसून येत नाही जेणेकरून काढणीला आलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान होत आहे.


          द्राक्षांची सर्वाधिक निर्यात करणारा अव्वल जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. गेल्यावर्षी नाशिकमधून ३८००० निर्यातक्षम बागांमधून शेतकऱ्यांनी एक लाख ११ हजार ६८४ टन निर्यात क्षम द्राक्ष पिकवली होती. मात्र यावर्षी तीस टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.  याआधी ५ हजार ५४ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. मात्र यंदा रशिया दुबई, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये फक्त ८६० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली. 


           तसंच ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचा गोडवा वाढण्याऐवजी आंबट द्राक्ष होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी, बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र उत्पादनावरच परिणाम होत असल्यामुळे द्राक्षांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
 

मागे

१७ लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही
१७ लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही

              नवी दिल्ली - एका सैनिकाच्या छातीवर पदक म्हणजे त्याच्यासा....

अधिक वाचा

पुढे  

नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी
नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत चोपलं, पत्नीची थिएटरमध्ये मर्दानी

                अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर....

Read more