ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान

शहर : बीड

अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय. पंढरपूर, बीड, सातारा या शहरांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय.पंढरपूरमधल्या अवकाळी पावसामुळे कासेगाव , टाकळी, सुस्ते, करकंब भागात द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतायत.. अवकाळी पावसाने काल रात्रीपासून पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये हजेरी लावलेली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती शेतक-यांना आहे.  काढणीला आलेल्या पिकांची नासाडी करणारा हा पाऊस असल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केलीय  हरभरा , ज्वारी  पिकांना  अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

बीड जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. धारूर तालुक्यातील तेलंगाव येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली.. सुदैवानं यात कोणतिही जीवित हानी झाली नाही.. जोरदार वारा विजांचा कडकडाट यामुळे उभ्या रब्बी पिकांचे नुकसान झालंय... काढणीला आलेली गहू, हरभरा, ज्वारी पीक धोक्यात आलीत..

सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस झाला आहे.विजांच्या कडकडाट सह रात्री तब्बल 2 तास पावसाची संततधार सुरू होती.आज सकाळ पासून पाऊस थांबला आला तरी ढगाळ वातावरण आणि रात्री झालेला पाऊस यामुळे थंड वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यातील फलटण,कोरेगाव,जावळी या भागात देखील या अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

 

मागे

सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?
सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. विदर्भात कोरोन....

अधिक वाचा

पुढे  

प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत
प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संकटाच्या काळात आपले प....

Read more