ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

PSI Exam|आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 07:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

PSI Exam|आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

शहर : मुंबई

राज्यातील असंख्य विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या उपनिरिक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षा  देत असतात. या परीक्षांच्या प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी, मुलाखत हे तीन टप्पे असतात. यातील शारिरीक चाचणीसंदर्भातील नियमांमध्ये लोकसेवा आयोगाने काही बदल केले आहेत.

उपनिरिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेत मुख्य परीक्षेनंतर शारिरीक चाचणी महत्वाचा टप्पा असतो. शारिरीक चाचणीत मिळालेले गुण अंतिम गुणतालिकेतही ग्राह्य धरले जात असत. परंतु आयोगाने आज अधिसूचना काढत शारिरीक चाचणीत मिळाळेले गुण अंतिम गुणतालिकेत धरण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

शारिरीक चाचणीचे गुण हे 60 टक्के म्हणजेच 60 गुण मुलाखतीस पात्र असण्यासाठी आवश्यक असणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी कमीत कमी 60 गुण असणे आवश्यक असणार आहे. आयोगाने सुधारित शारिरीक मानके अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्रसिद्ध केली आहेत.

 

 

 

 

 

पुढे  

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत....

Read more