ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

शहर : पुणे

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओकडे केला आहे. एकूण पाचशे रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव आरटीओकडे दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या 60-65 बसेसचा रुग्णवाहिकांसाठी वापर करण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात रुग्णवाहिका संख्या वाढवण्याचा प्रयत्न सध्या स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे.

जिल्ह्यात सध्या 461 सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पुणे शहरात 215, पिंपरी चिंचवड 115 आणि ग्रामीण भागात 131 रुग्णवाहिका आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक रुग्णालयाकडे स्वतःच्या 2 ते 4 रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे सध्या रुग्णवाहिका पुरेशा आहेत.

कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिका वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागात 131 सरकारी रुग्णवाहिका असून आणखी रुग्णवाहिकांची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या सबळ असणाऱ्या रुग्णवाहिकांना ग्रामपंचायत स्वतःच्या गावासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मागे

अनलॉकनंतर नवी मुंबईतील 146 पोलिसांना कोरोना, कुटुंबीयही विळख्यात
अनलॉकनंतर नवी मुंबईतील 146 पोलिसांना कोरोना, कुटुंबीयही विळख्यात

अनलॉकनंतर पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाईदरम्या....

अधिक वाचा

पुढे  

मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू
मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाईझ करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचा म....

Read more