ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

राज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 15, 2021 09:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

शहर : मुंबई

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाडा तर दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात १७ आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ झालीय. यामुळे गारवा घटल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे १६ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

 मुंबईत गेल्या आठवड्यात एकाच दिवसात तापमानात चार ते पाच अंशाने वाढ आणि घट नोंदविली जात होती. आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यात देखील गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील नीचांकी किमान तापमान नोंदवण्यात आलंय.

मागे

आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल
आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पुणे दौऱ्यावर हो....

अधिक वाचा

पुढे  

पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव इथे पपई भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात १५ मजुरांचा मृत....

Read more