ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रामदास बोट अपघाताचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम यांचं निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रामदास बोट अपघाताचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम यांचं निधन

शहर : रायगड

रामदास बोट अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती आणि घटनेचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम उर्फ बारक्याशेठ यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मुकादम हे रामदास बोट अपघातातील एकमेव साक्षीदार होते. रामदास बोटीला झालेल्या अपघातामुळे बोटीतील इतर सर्व प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला होता. परंतु मुकादम यांना पोहायला येत असल्याने त्याने पोहून समुद्र किनारा गाठला होता.

विश्वनाथ मुकादम यांच्या निधनामुळे सदर प्रकरणाचा इतिहास सांगणारे व्यक्ती आज जगातून निघून गेले. मुकादम यांच्यामुळेच रामदास बोट अपघाताचा उलगडा झाला होता. मुकादम यांच्या अंत्यविधीला अलिबागमधील स्थानिक राजकारणी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

रामदास बोट अपघात प्रकरण

टायटानिक या बोटीसोबत झालेला प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. असाच प्रसंग महाराष्ट्रात 60 वर्षांपूर्वी घडला होता. प्रवाशांना मुंबईवरुन रेवस धक्क्याला घेऊन जाणाऱ्या रामदास बोटीला अपघात झाला होता. या अपघातात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला होता.१७ जुलै १९४७ रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य देखील मिळाले नव्हते. सकाळची वाजताची वेळ होती. रामदास बोट मुंबईच्या धक्क्यावरुन जवळपास ७५० पेक्षा अधिक माणसे घेऊन निघाली होती. यात प्रवाशांसह रामदास बोटीतील कामगार आणि खलाशांचा देखील समावेश होतारामदास बोट प्रवाशांना घेऊन रेवस बंदराच्या दिशेने निघाली असताना काशाच्या खडकाजवळ बोट पोहचली आणि वातावरण अचानक बदलले. ऐन पावासाची वेळ होती. वातावरणात बदल झाल्याने मोठ्या लाटा उसळल्या. या लाटांमध्ये आल्याने रामदास बोटीला जलसमाधी मिळाली.

बोट बुडत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी आटापीटा केला. परंतु बोटीवरील 750 पेक्षा अधिक प्रवांशापैकी काही मोजक्या प्रवाशांना आपला जीव वाचवता आला. तर इतर प्रवाशांना बोटीसोबत जलसमाधी मिळाली होती.जीव वाचलेल्या मोजक्या प्रवाशांपैकी एक म्हणजेच विश्वनाथ मुकादम उर्फ बारकुशेठ हे होते. त्यावेळेस विश्वनाथ वयाने फारच लहान होते. परंतु पोहायला येतल असल्याने त्यांनी जीवाच्या आकांताने पोहून समुद्रकिनारा गाठला. ते सुरक्षितरित्या पोहचले आणि रामदास बोट अपघात प्रकरणाचा ऊलगडा झाला.

मागे

भाजपाचे नेते इंदिरा गांधींप्रमाणेच  माझ्या 'पीएसओ'करवी मला ठार मारू शकतात -  केजरीवाल
भाजपाचे नेते इंदिरा गांधींप्रमाणेच माझ्या 'पीएसओ'करवी मला ठार मारू शकतात - केजरीवाल

लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या - सातव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. या न....

अधिक वाचा

पुढे  

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून आज अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभाग....

Read more